Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १६व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सौम्या शर्मा यांचा प्रवास

Success Story Of IAS Saumya Sharma: आयएएस सौम्या शर्मा यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले.

Siddhi Hande

यूपीएससी ही सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत सर्वात उच्च पदावर आपण कामे करु शकतो. यूपीएससी परीक्षा पास करणे खूप अवघड आहेत. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा देतात. परंतु काही तरुणांनाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते. असंच यश सौम्या शर्मा यांनादेखील मिळाले. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सौम्या शर्मा या लहान असतानाच त्यांची ऐकण्याची क्षमता केली होती. १६ व्या वर्षी अचानक त्यांना ऐकू येत नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनीदेखील यांना ऐकू येणार नाही असं सांगितलं. त्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली.

सौम्या शर्मा यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी २३ व्या वर्षी हे यश प्रार्त केले आहे. सौम्या यांना परीक्षेच्याच दिवशी ताप आला होता. त्यामुळे त्यांचे आईवडिल त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. अशा परिस्थितीतही त्यांनी यश मिळवले.

यूपीएससी परीक्षा देण्याआधी त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. त्या दिव्यांग असतानाही त्यांनी सामान्य श्रेणीतून फॉर्म भरला. त्यांनी आपल्या स्मार्ट वर्कवने हे यश मिळवले आहे. सौम्या यांच्या आईवडिलांनी त्यांची खूप साथ दिली. त्यांनी रात्रदिवस एक करुन अभ्यास केला. त्यांनी घरीच अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

Mumbai Heat News : मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा, पारा 37 अंशावर | VIDEO

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

SCROLL FOR NEXT