केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते.केंद्र सरकार आणि एलआयसीने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होते. एलआयसी विमा सखी योजनेत महिला दर महिन्याला ७००० रुपये मिळवू शकतात. (LIC Vima Sakhi Yojana)
डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते.ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभ मिळतो.
वीमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना वीमा एजंट बनवले जाते. आणि गावात विम्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल. ही योजना भारतातील तळागाळात पोहचली तर विम्याबाबत जनजागृती होईल.
एलआयसी विमा सखी योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. १०वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत एका वर्षात १ लाख महिला तर तीन वर्षात २ लाख महिला जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत महिलांना विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यायचे आहे. जर महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन मिळणार आहे. याचसोबत दर महिन्याला ठरावीक रक्कमदेखील दिली जाणार आहे.
या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. पहिल्या वर्षी ७००० रुपये देतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला ६००० रुपये दिले जातील. तिसऱ्या वर्षीत ५००० रुपये दिले जातात. तसेच या योजनेत महिलांना कमिशनदेखील मिळते. या योजनेत महिलांना ट्रेनिंगदेखील दिले जाते. यामुळेच महिलांना दर महिन्याला रोजगार निर्माण होतो. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. १०वी पास महिलांना या योजनेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.