पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि आता यशश्री मुंडे...भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडें यांच्या धाकट्या मुलीची राजकारणात एन्ट्री होतेय. त्याला निमित्त ठरलीय, वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेची निवडणूक...बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी यशश्री यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. कोण आहेत यशश्री मुंडे पाहूयात...
कोण आहेत यशश्री मुंडे?
यशश्री ही गोपीनाथ मुंडे यांची धाकटी लेक
यशश्री मुंडे या पेशाने वकील
अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठात LLM चे शिक्षण पूर्ण
विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट’ या पुरस्काराने सन्मानित
शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय
मात्र वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल
याआधी बैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आले होते. यावेळी प्रितम आणि यशश्री दोघीही निवडणूक लढवत आहेत. दरम्यान गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा कशा पद्धतीनं मुलींकडून चालवला जातोय.. पाहूयात
1) पंकजा मुंडे (थोरली मुलगी)
विधानपरिषदेच्या आमदार म्हणून कार्यरत
पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी
2009 पासून राजकारणात सक्रीय
2) प्रितम मुंडे (मधली मुलगी)
2014 ते 2024 पर्यंत बीड लोकसभा
मतदारसंघातून भाजपच्या आमदार
त्वचारोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत
3) यशश्री मुंडे (धाकटी मुलगी)
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून राजकारणात उतरणार
वकील म्हणून कार्यरत
वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. प्रितम मुंडे, यशश्री मुंडे या भगिनींसह 71 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. या निवडणुकीच्या निमित्तानं पंकजा मुंडेंनी आपल्या धाकट्या बहिणीला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलंय. भविष्यात तीन बहिणींची ही जोडी राजकीय क्षेत्रातही एकत्र पाहायला मिळेल का याची उत्सुकता असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.