Nashik News : आमदाराचा त्रास; महिला काँग्रेस तालुका अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीत लिहिलं...

Nashik : नाशिकमधील कळवणमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळवणच्या आमदाराने त्रास दिल्याने महिला काँग्रेस तालुका अध्यक्षाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik News
Nashik NewsSaam Tv
Published On

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिकमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील महिला तालुका अध्यक्षा यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या तालुका अध्यक्ष महिलेने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील कळवण येथील काँग्रेस तालुका अध्यक्ष शितल महाजन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. या नोटमध्ये आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून मी जीव संपवत आहे असे शितल महाजन यांनी नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik News
Crime News : बायकोचं ऐकून संतापला नवरा, रागात गाठलं क्लिनिक; धारदार शस्त्रानं कापला डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट

विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधात काम केल्याने माझ्या पतीला आमदार नितीन पवार वारंवार त्रास देत असल्याचे आरोप देखील शितल महाजन यांनी केले आहेत. त्यांच्या तक्रार अर्जानुसार, नितीन पवार हे पदाचा गैरवापर करुन शितल महाजन यांचे पती रामराव महाजन यांना सतत त्रास देत होते. पवार यांच्यामुळे महाजन दांपत्याला मानसिक त्रास झाला. या त्रासाला कंटाळून शितल महाजन यांनी आत्महत्या केली.

Nashik News
Maharashtra Politics : 'देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर, दोघांचा कारभार एकसारखा..' काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका

शितल महाजन यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरणी कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिकची चौकशी करत आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे कळवणमध्ये खळबळ उडाली आहे.

Nashik News
Mohammed Shami : रंग उधळताय, शरीयतचा अनादर करताय.. लेकीने होळी खेळल्याने मोहम्मद शमीवर भडकले मौलाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com