बिझनेस

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

LIC Vima Sakhi Yojana: एलआयसी विमा सखी योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळणार आहे. त्यांना विमा सखी म्हणून काम करायचे आहे. याद्वारे त्यांना ग्रामीण भागात एलआयसीच्या पॉलिसीबद्दल जनजागृती करायची आहे.

Siddhi Hande

LIC ची विमा सखी योजना

महिलांना दर महिन्याला मिळणार ७००० रुपये

१०वी पास महिला करु शकतात अर्ज

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीने नागरिकांसाठी अनेक योजना राबवली आहे. एलआयसीच्या विमा पॉलिसी योजनेत महिलांना पैसे मिळतात. महिला सशक्तीकरणासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. एलआयसी विमा सखी योजनेतील महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळतात. याचसोबत कमिशनदेखील दिले जाते.

दर महिन्याला मिळणार ७००० रुपये (LIC Vima Sakhi Yojana Women Get 7000 Rupees)

केंद्र सरकाने २०२४ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. या योजनेत महिन्याभरात जवळपास ३०,००० महिलांना रजिस्ट्रेशन केले होते. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिली जाणारी ही योजना आहे. याचसोबत योजनेच्या माध्यमातून वंचित भागात इन्श्युरन्सची माहिती पोहचण्यासाठी मदत होते.

एलआयसी विमा सखी योजनेत महिला एलआयसी एजंट (LIC Agent) म्हणून काम करतात. या योजनेत महिलांना पहिल्या वर्षी ७००० रुपये, दुसऱ्या वर्षी ६००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी महिन्याला ५००० रुपये दिले जातात.यासाठी मोफत ट्रेनिंगदेखील दिले जाते.महिलांनी त्यांचे टार्गेट पूर्ण केल्यावर त्यांना कमीशनदेखील दिले जाते.

ऑनलाइन अर्ज करा

एलआयसी विमा सखी योजनेत काम करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.https://licindia.in/test2 वर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला खाली विमा सखी हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. यामध्ये सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर फॉर्म फिल करुन सब्मिट करा. त्याआधी एकदा चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT