LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme: एकदा गुंतवणूक करा अन् सेवानिवृत्तीनंतर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC च्या या योजनेत मिळणार भरघोस परतावा

Lic New Jeevan Shanti Yojana: एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर १ लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात पेन्शन मिळते. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन शांती योजना. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळते.(LIC Jeevan Shanti Yojana)

सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला पेन्शन दिली जाते. तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन दर महिन्याला पेन्शन मिळू शकतात. एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची असते. त्यानंतर आयुष्यभर पेन्शन मिळते.

एलआयसी जीवन शांती योजना

एलआयसीची जीवन शांती योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही दर वर्षी १,००,००० रुपये पेन्शन मिळवू शकतात. एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेत ३० ते ७९ वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ असे दोन ऑप्शन असतात. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात.

एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत तुम्ही १ लाख रुपयांची वार्षिक पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. जर तुम्ही या योजनेत ११ लाख रुपये गुंतवतात आणि हे पैसे ५ वर्षांसाठी गुंतवले असतील तर तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर दर वर्षी १,०२,८५० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

या योजनेत तुम्हाला ६ महिन्याच्या आधारे व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला ५०,३६५ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला ८,२१७ रुपये पेन्शन दर महिन्याला मिळेल. एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर गुंतवलेली रक्कम नॉमिनीच्या अकाउंटला जमा केली जाते. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT