LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: एकदा पैसे गुंतवा अन् आयुष्याभर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC न्यू जीवन शांती पॉलिसी नेमकी आहे तरी काय?

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करत असतात. अनेक सरकारी योजना, बँकेच्या योजना, एफडी यामध्ये नागरिक गुंतवणूक करत असतात. जर तुम्हीही तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एलआयसी जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतात.

एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. एकदा गुंतवणूक करुन तुम्ही आयुष्यभर चांगली पेन्शन मिळवू शकतात. (LIC Policy)

LIC च्या न्यू जीवन शांती पॉलिसीअंतर्गत गुंतवणूकीवर तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. रिटायरमेंटनंतरच्या प्लानिंगसाठी एलआयसीची ही योजना खूप फायदेशी आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला नियमित पेन्शनची गॅरंटी दिली जाते. तुम्ही १ लाख रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

LIC न्यू जीवन शांती पॉलिसीमध्ये ३० ते ७९ वयापर्यंतचे लोक अर्ज करु शकतात. या योजनेत निश्चित पेन्शनसह अनेक फायदे मिळतात. यामध्ये अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ (Annuity For Single Life)आणि (Deffered Annuity For Joint Life)मध्ये गुंतवणूक करु शकतात.

एलआयसी न्यू जीवन शांती पॉलिसी हा एक अॅन्युटी प्लान आहे. ज्यामध्ये तु्म्हाला एक निश्चित अमाउंट पेन्शन म्हणून मिळते. जर तुम्ही ५५व्या वर्षी पॉलिसीमध्ये ११ लाख रुपयांची गुंतवणूक करता तर तुम्हाला ६०व्या वर्षी प्रत्येक वर्षाला १,०२८५० रुपयांची पेन्शन मिळेल. (LIC New Jeevan Shanti Policy)

११ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला वर्षाला १ लाख रुपये मिळतात. जर तुम्ही ६ महिन्यांनी पैसे काढत असाल तर तुम्हाला ५०,३६५ रुपये दर सहा महिन्याला मिळतील. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात. या योजनेतील गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ECGC Recruitment: पदवीधर तरुणांना ECGC मध्ये ऑफिसर होण्याची संधी; पगार १,२०,००० रुपये; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Rohini Khadse : बाप रे बाप! रोहिणी खडसेंनी पकडला भलामोठा साप; VIDEO तुफान व्हायरल, धाडसाचं होतंय कौतुक

Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील मुलींसाठी खास योजना! जन्मानंतर मिळणार १ लाख रुपये; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

Abdul Sattar vs BJP : अब्दुल सत्तारांविरोधात भाजप पदाधिकारी एकवटले; आज सिल्लोड बंदची हाक

Guru Vakri: 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह होणार वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार धन

SCROLL FOR NEXT