LIC Jeevan Anand Policy Google
बिझनेस

LIC Jeevan Anand: दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख कमवा; LIC जीवन आनंद पॉलिसीत मिळतो लाखो रुपयांचा बोनस

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीने नागरिकांसाठी खास एलआयसी जीवन आनंद पॉलिसी सुरु केली आहे. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीनंतर लाखो रुपयांचा बोनस मिळतो.

Siddhi Hande

प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे फार आधीपासूनच पैशांची बचत करत असतात. प्रत्येकजण गुंतवणूक करुन जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूक करताना जिथे चांगला आणि सुरक्षित परतावा मिळतो, अशाच योजनांमध्ये गुंतवणूक करावी. यासाठी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी हा बेस्ट पर्याय आहे.

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत तुम्ही रोज थोडी थोडी गुंतवणूक करुन लाखो रुपये मिळवू शकतात. तुम्हाला रोज फक्त ४५ रुपये गुंतवायचे आहेत. यातून तुम्ही २५ लाख रुपये मिळवू शकतात.

एलआयसी जीवन आनंद ही एक टर्म पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला प्रिमियम भरायचे असतात. या योजनेत पॉलिसीधारकांना मॅच्युरिटी बेनिफिट मिळतात. या योजनेत कमीत कमी १ लाख रुपये एश्योर्ड असतात. जास्तीत जास्त रक्कमेसाठी लिमिट नाही.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीत १३५८ रुपये महिन्याला गुंतवायचे आहेत. यासाठी तुम्हाला दर दिवशी ४५ रुपये जमा करायचे आहे. तुम्हाला ३५ वर्षांसाठी हे पैसे जमा करायचे आहेत. या योजनेत तुम्ही वर्षाला १६३०० रुपयांची बचत करणार आहात. या योजनेत तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहेत.

या योजनेत तुम्ही दरवर्षी १६३०० रुपये गुंतवायचे आहेत. तुम्ही एकूण ५,७०,५०० रुपये जमा करणार आहेत. यातील बेसिक एश्योर्ड रक्कम ५ लाख रुपये असते. त्यानंतर रिविजनरी बोनस ८.६० लाख मिळतो आणि फायनल बोनस ११.५० लाख रुपये मिळतात. या योजनेत जर तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली तर हा बोनस दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips : 'या' 8 गोष्टींची मुलांना आत्ताच लावा सवय, मेंदू होईल तीक्ष्ण

Maharashtra Live News Update: बीड शहरातील एकनाथ नगर भागात चोरांचा सुळसुळाट

स्कॅममध्ये अडकली अन् डोक्यावर २८ लाखांचं कर्ज; बँकेतच स्वत:ला संपवलं; चिठ्ठीतून शेवटची इच्छा केली व्यक्त | Crime

भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले अन्...; वसईतल्या कार्यक्रमात थरारक प्रसंग|VIDEO

Chakan Fort : पुण्यातील चाकण किल्ला पाहिला का? सुट्टीत मुलांसोबत नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT