LIC Jobs Saam Tv
बिझनेस

LIC Jobs: सरकारी नोकरीची संधी; LIC मध्ये मिळणार १९ लाखांचं पॅकेज; अर्ज कसा करावा?

LIC HFL Recruitment 2025: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आयटी प्रोफेशनल पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रकिया सुरु झाली आहे.

Siddhi Hande

LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

आयटी प्रोफेशनल पदांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एलआयसी ही एक सरकारी कंपनी आहे. कंपनीने आयटी प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ही भरती केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदावर नियुक्ती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी www.lichousing.com वर जाऊन अर्ज करायचे आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स ही देशातील प्रमुख हाउसिंग कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीत भरती जाहीर केली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

एलआयसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ डिसेंबर २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२५ आहे. २८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी भरती झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईत होणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, टेक्निकल स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १६.५० ते १९.१५ लाखांचं पॅकेज मिळणार आहे.

पात्रता

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई-आयटी/सीएस, एमसीए, एमटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत विज्ञान किंवा आयटी क्षेत्रात पदवी प्राप्त उमेदवारही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आयटी फील्डमध्ये कामाचा कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Emraan Hashmi : सई ताम्हणकरनंतर 'ही' मराठमोळी अभिनेत्री इमरान हाश्मीसोबत झळकणार, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम, हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या; आज कुठे कसं हवामान?

Expressway Accident : हायवेवर पहाटे काळाचा घाला, ७ बसे अन् ३ कार जळून खाक, ७ जणांचा जळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणार! १५०० नाही तर ₹३००० मिळणार; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT