LG 24MR400 Saam Tv
बिझनेस

LG चा मोठा डिस्प्ले फक्त 6299 रुपयांमध्ये, कंपनीची जबरदस्त ऑफर

LG HD Monitor: टेक ब्रँड LG ने भारतात आपली नवीन फुल एचडी मॉनिटर रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने हा मॉनिटर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सादर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

LG HD Monitor:

टेक ब्रँड LG ने भारतात आपली नवीन फुल एचडी मॉनिटर रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने हा मॉनिटर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सादर केला आहे. यावर ग्राहकांना विशेष सवलतीचा लाभ देखील मिळणार आहे. नवीन लाइनअपमध्ये तीन मॉडेल्स समाविष्ट करण्यात आली आहेत - LG 22MR410, 24MR400 आणि 27MR400.

फीचर्स आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, LG 22MR410 मध्ये 21.5 इंच फुल HD VA डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1920x1080 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले चांगल्या गेमिंग अनुभवासाठी 100Hz रिफ्रेश रेट देतो. ऑनस्क्रीन कंट्रोल व्यतिरिक्त, हा डिस्प्ले रीडर मोड आणि फ्लिकर सॅफ्ट टेक्नोलॉजीला देखील सपोर्ट करतो.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

LG 24MR400 मॉनिटरमध्ये 23.8-इंचाचा IPS फुल HD डिस्प्ले आहे. 1920x1080 पिक्सेल रिझोल्यूशन व्यतिरिक्त, या स्क्रीनमध्ये 100Hz रिफ्रेश रेटचा फायदा देखील आहे. यात रीडर मोड आणि फ्लिकर सेफसह डायनॅमिक ॲक्शन सिंक आणि ब्लॅक स्टॅबिलायझर सारखे फीचर्स आहेत. यात ऑनस्क्रीन कंट्रोल आणि ऑडिओ इनपुट स्विचेस आहेत.  (Latest Marathi News)

27-इंचाचा IPS फुल एचडी डिस्प्ले

तिसऱ्या LG 27MR400 मॉडेलमध्ये 1920x1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 100Hz रिफ्रेश रेटसह 27-इंचाचा IPS फुल एचडी डिस्प्ले आहे. मागील मॉडेलप्रमाणेच यात डायनॅमिक ॲक्शन सिंक, ब्लॅक स्टॅबिलायझर, रीडर मोड आणि फ्लिकर सेफ सारखे फीचर्स आहेत. त्या सर्वांमध्ये AMD FreeSync™ टेक्नोलॉजीसह 2-साईड व्हर्चुअल बॉर्डरलेस डिझाइन आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, LG 22MR410 ची किंमत 6,299 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय 24MR400 आणि 27MR400 मॉडेलच्या किंमती अनुक्रमे 7,999 रुपये आणि 10,999 रुपये ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT