Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: शिक्षण अर्धवट सोडलं, कित्येक रात्री रेल्वे स्टेशनवर काढल्या, आज उभारली ९२००० कोटी रुपयांची कंपनी

Success Story Of Businessman Satyanarayan Nandlal Nuwal: बिझनेसमॅन सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचा प्रवास खूपच मोठा आहे. त्यांनी अनेक रात्री या रेल्वे स्टेशनवर काढल्या आहेत.

Siddhi Hande

परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यावर मात करायची असते. परिस्थिती आपल्याला बदलते, असं आपण ऐकलं आहे. परंतु आपणही परिस्थितीला बदलू शकतो. असंच काहीसं सत्यनारायण नंदलाल नुवाल (Satyanarayan Nandlal Nuwal) यांच्यासोबतही झालं. त्यांच्याकडे पैसे नसल्याने कित्येक रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनवर काढल्या आहेत. परंतु आपले प्रयत्न सुरु ठेवले. आज ते ९२००० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत.

सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे (Solar Industries India) संस्थापक सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म राजस्थानमधील भीलवाडा येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती. त्यामुळे कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांना दहावीनंतर पुढे शिक्षण घेता आले नाही. त्यांनी १८ व्या वर्षीच स्वतः चा शाई उत्पादनाचा कारखाना उभारला. परंतु यात ते अयशस्वी ठरले. परंतु त्यांनी हार मानली नाही.

सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचे १९व्या वर्षीच लग्न झाले. त्यावेळी घर भाड्याने घेऊन राहण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे ते अनेक रात्री रेल्वे स्टेशनवर राहिले. त्यांची भेट एक्सप्लोसिव डील अब्दुल सत्तार अल्लाहभाई यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलंलं. त्यांना १९९५ रोजी स्टेट बँकेतून ६० लाखांचे लोन मिळाले. त्यानंतर त्यांनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाची स्थापना केली.आज या कंपनीची किंमत ९२००० कोटी रुपये आहे.

सोलर इंडस्ट्रीज इंडिया ही खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीचे मूल्य १० वर्षात १,७०० टक्क्यांनी वाढले आहेत. सत्यनारायण नंदलाल नुवाल यांची नेटवर्थ ४.९ अरब डॉलर आहे. त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT