Lava ने भारतात त्यांच्या Yuva सीरीजचा नवीनतम स्मार्टफोन लॉन्च केला. Lava Yuva 2 5G हा कंपनीचा नवीन हँडसेट आहे आणि यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिलाय. डिव्हाइसमध्ये Unisoc T760 चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 6.67 इंच HD+ स्क्रीन सारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
Lava Yuva 2 5G स्मार्टफोनच्या 4 GB रॅम 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन देशभरातील रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. सध्या कंपनीने हा हँडसेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाहीये. लावा हा स्मार्टफोन मार्बल ब्लॅक आणि मार्बल व्हाईट रंगात उपलब्ध असेल. हा फोन एका वर्षाच्या वॉरंटीसह येतो.
Lava Yuva 2 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD+ स्क्रीन आहे ज्याचा रीफ्रेश दर 90 Hz आहे. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 700 nits आहे. या लावा हँडसेटमध्ये Unisoc T760 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आहे. भारतीय कंपनीचा हा स्मार्टफोन 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम ऑप्शनसह येतो. या फोनमध्ये 128 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. हँडसेट Android 14 OS सह येतो. कंपनीने फोटोग्राफीसाठी Lava Yuva 2 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.
डिव्हाइसमध्ये 50MP AI प्राथमिक रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा दुसरा सेन्सर कॅमेरा दिलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर कॅमेरा देण्यात आलाय. या लावा फोनच्या मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये नोटिफिकेशन लाइट उपलब्ध आहे. इन-सिस्टम आणि ॲप नोटिफिकेशन्ससह जेव्हा इनकमिंग कॉल असेल तेव्हा लाईट ब्लिंक सुद्धा होतो.
Lava Yuva 2 5G ला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी प्रदान केलीय. USB टाइप-सी पोर्टद्वारे 18W वायर्ड चार्जिंगसाठी मदत करते. या हँडसेटमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील आहेत. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर्स देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.