Lava Blaze X 5G gadget 360
बिझनेस

Lava Blaze X 5G: पुढील आठवड्यात लॉन्च होणार Lava चा बजेटवाला फोन; जाणून घ्या Blaze X 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

Lava Blaze X 5G: स्मार्टफोन निर्माती लावा कंपनी भारतात आपला नवा मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील आठवड्यात Lava Blaze X 5G लॉन्च करणार आहे.

Bharat Jadhav

लावा कंपनी भारतात नवीन फोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लावा कंपनी Lava Blaze X 5G हा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. जर तुम्ही कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. लावा ब्लेझ फोन लॉन्च होण्यापूर्वी त्याची किंमत आणि फोनचे फीचर्सची माहिती समोर आलीय.

पुढच्या आठवड्यात Blaze X 5G फोन भारताच्या बाजारात येणार आहे. हा स्मार्टफोन भारतात MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह येऊ शकतो. या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची मोठी बॅटरी मिळेल. ज्यामुळे ही बॅटरी एकदा चार्ज केली तरी दिवसभर सक्रीय राहील. फोन त्वरीत चार्ज करण्यासाठी, त्याला 33W फास्ट चार्जिंग मिळणार आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, Blaze X 5G चे तीन व्हेरिएंट येणार आहेत. कंपनी Lava Blaze X 5G या फोनची विक्री अॅमेझॉन प्राइम डे च्या दिवसापासून करेल. Lava Blaze X 5G स्मार्टफोन भारतात 4GB, 6GB आणि 8GB रॅम अशा तीन प्रकारात येणार आहे. कंपनी या फोनमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज क्षमता देणार आहे. भारतात या फोनची किंमत 15 हजार रुपये राहू शकते.

लावा कंपनी हा स्मार्टफोन 10 जुलै रोजी भारतात लॉन्च करू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या व्हिडिओसंदर्भात एक टीझर व्हिडिओ देखील सादर करण्यात आलाय. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, कंपनीने वर्तुळाकार डिझाइनमध्ये कॅमेरा मॉड्यूल दिलेत. या फोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.

लावा या बजेट स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही दिला जाऊ शकतो. म्हणजेच तुम्ही या फोनची रॅम 16GB पर्यंत वाढवू शकता. म्हणजे यात तुम्हाला 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा पर्याय मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT