Petrol Diesel Price SaamTV
बिझनेस

Petrol Diesel Price 30 July: अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे! जाणून घ्या आजचा दर

Petrol Diesel Price Today 30 july 2023: भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.

Shivani Tichkule

Petrol Diesel Price in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल 80.58 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.99 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

आज राज्य पातळीवर कोणत्याही राज्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात चढ-उतार दिसत नाही. सर्व राज्यांमध्ये शनिवारच्या दरानेच पेट्रोल-डिझेलची विक्री होत आहे. महानगरांमध्येही दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT