Sona Chandi Bhav : मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. मागच्या महिन्यांपासून सोन्याचे भाव किंचित प्रमाणात वाढले देखील व भाव घसरला देखील.
आंतरराष्ट्रीय बाजारात सेन्सेक्सने 66 हजारांचा टप्पा पार केल्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कालपर्यंत सोन्याचा भाव ५८ हजारांच्या आसपास होता तर आज त्याने ५९ हजार रुपयांचा टप्पाही ओलांडला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे.
आजही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, कालही चांदीच्या दरात वाढ दिसून आली. MCX एक्सचेंजवर ५९,२३० रुपये प्रति 10 ग्रॅमला काल सकाळी सोन्याचे दर होते तर बुधवारी संध्याकाळी तो ५९,१८८ रुपयांवर बंद झाला होता.
1. चांदीच्या भावातही वाढ
सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या (Silver) दरातही वाढ झाली आहे. आज गुरुवारच्या दिवशी चांदीच्या भावात वाढ दिसून येत आहे. MCX वर चांदीची किंमत (Price) 73685 रुपये प्रति किलोपासून सुरु झाली आहे.
2. जागतिक सोन्याची किंमत
गुरुवारी सकाळी सोन्याच्या (Gold) जागतिक किमतीत वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर, सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.18 टक्के किंवा $3.60 च्या वाढीसह $1965.30 प्रति औंसवर व्यापार करत होती. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत 0.20 टक्के किंवा $3.88 च्या वाढीसह $ 1961.23 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.
3. आज सोन्याचा भाव किती
एमसीएक्सवर सोने आज 59290 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले आहे परंतु, आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 55,940 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,290 रुपये मोजावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.