Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (9th August): सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा भाव

Today's 9th August Gold Silver Rate In Maharashtra : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th August):

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल होताना दिसून आले आहे. अमेरिकन महागाईच्या आकड्यांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा आहे. याचा परिणाम सोने-चांदीवर दिसून आला आहे.

ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीत घसरण दिसून आली तर जुलै महिन्यात सोन्याच्या भावाने उंच्चाकाची पातळी गाठली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. १० ग्रॅम सोन्यासाठी आज किती पैसे मोजावे लागतील पाहूया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार ८ ऑगस्टला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55200 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,210 रुपये मोजावे लागले होते. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55100 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,110 रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

आज गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार १० ग्रॅम चांदीसाठी 7३५ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी आज पाहायला मिळेल.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याची किंमत 59,950 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) दर 59,950 रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,950 रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT