Ladli Laxmi Yojana Saam Tv
बिझनेस

Ladli Laxmi Yojana: मुलींच्या शिक्षणासाठी सरकार देतंय १ लाख ४३ हजार रुपये; लाडली लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Ladli Laxmi Yojana For Girls: मध्य प्रदेश सरकारने मुलींसाठी खास लाडली लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची मदत केली जाते.

Siddhi Hande

मुलींसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. मुलींना योग्य शिक्षण मिळावे, त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी योजना राबवल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने मुलींसाठी खास लाडली लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत सरकार मुलींना १ लाख ४३ हजार रुपये देते.

तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला एक लाख रुपये दिले जातात. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जातात.२००७ साली मध्य प्रदेश सरकारने ही योजना सुरु केली होती. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली आहे. यात मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत आर्थिक मदत केली जाते.

लाडली लक्ष्मी योजनेत मुली जन्माला येताच लखपती होतात. या योजनेत वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये १ लाख ४३ हजार रुपये दिले जातात. तुमची मुलगी जेव्हा सहावीत जाते तेव्हा तिला २ हजार रुपये दिले जातात. नववीत गेल्यावर ४ हजार रुपये दिले जातात. अकरावी आणि १२वीत गेल्यावर ६-६ हजार रुपयांची मदत केली जाते.

यानंतर मुलगी ग्रॅज्युएशन किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असेल तर तिला २५ हजार रुपये दिले जातात. दोन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. जर तुमची मुलगी २१ वर्षांची झाली आणि तिचे लग्न झाले नसेल तर तिला १ लाख रुपये दिले जातात.

लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही मध्य प्रदेशची रहिवासी असणे गरजेचे आहे. आईवडिलांना फक्त एक किंवा दोन मुले हवे. त्यांनी दोन मुलानंतर कुटुंब नियोजन केलेले असावे. तसेच आईवडिल आयकर भरत नसावे. या योजनेतसाठी मुलीच्या जन्मानंतर ५ वर्षाच्या आता रजिस्ट्रेशन करायचे आहे. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकतात. अंगणवाडी केंद्रात जाऊन किंवा अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT