मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजना
महिलांच्या खात्यात ३३वा हप्ता जमा होणार
आजपासून महिलांना मिळणार १५०० रुपये
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यानंतर विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारनेही महिलांसाठी लाडली बहना योजना राबवली आहे. या योजनेत आता महिलांना ३३वा हप्ता देण्यात येणार आहे. आज १४ फेब्रुवारी रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.
मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी लाडली बहना योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता ३३वा हप्ता आज दिला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव हे खंडवा जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत.
मुख्यमंत्री लाडली बहना योजनेचा याआधीचा हप्ता १६ जानेवारी रोजी देण्यात आला होता. नर्मदापुरम येथून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. यानंतर पुन्हा महिलांना पैसे दिले जाणार आहे. दरम्यान, योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आली आहे. १ लाख महिलांचा लाभ बंद केला आहे.
अपात्र महिलांची नावे वगळली
लाडकी बहीण योजनेतून जवळपास एक लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहे. या योजनेत सुरुवातीला १.३२ कोटी महिला लाभ घेत होते. त्यानंतर आता ही संख्या १.२६ कोटी झाली आहे. मागच्या महिन्यात १ लाख महिलांची नावे वगळली आहेत. या योजनेत पात्र नसतानाही महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यानंतर आता त्यांना पैसे मिळणार नाहीत.
स्टेट्स कसा चेक करायचा? (Ladli Behna Yojana Status Check)
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही चेक करु शकतात. तुम्ही https://cmladlibahna.mp.gov.in/ वर जाऊन चेक करु शकतात. तिथे तुम्हाला स्टेट्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा आयडी टाकायचा आहे. ओटीपी टाकून वेरिफाय करायचे आहे. यानंतर तुम्हाला स्टेट्स दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.