

विमान प्रवासात महिलेवर बलात्कार
सिंगापूरवरून ऑस्ट्रेलियाला जात होते विमान
५२ वर्षीय भारतीय नागरिकाला पोलिसांनी केली अटक
ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात एका प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ५२ वर्षीय भारतीय नागरिकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी सिंगांगवरून पार्थला जाणाऱ्या स्कू एअरलाइन्सच्या विमानात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
जवळपास साडेचार तासांच्या या प्रवासादरम्यान भारतीय नागरिक असलेल्या ५२ वर्षीय सुधीर कुमार चौहानने महिलेवर बलात्कार केला. आरोपी महिलेच्या शेजारच्या सीटवर बसला होता. त्याने महिलेचे परवानगी न घेता तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
घाबरलेल्या महिलेने तात्काळ विमानातील क्रू मेंबर्सला घटनेची माहिती दिली. क्रू मेंबर्सने तात्काळ कारवाई करत सुरूवातीला या महिलेला दुसऱ्या सीटवर बसण्यास जागा करून दिली आणि आरोपीवर नजर ठेवली. विमान पर्थ विमानतळावर पोहचताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पर्थ विमानतळावर उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पोलिस सेक्स असॉल्ट स्क्वॉड घटनास्थळी आले होते. विमानातून उतरताच त्यांनी सुधीर कुमार चौहानला अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.