Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे विकासकामं अडकली, कंत्राटदारांचे 89 हजार कोटी थकले का? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या विकास कामं दोडकी होऊ लागल्याचं समोर आलंय. नेमक्या किती हजार कोटींची कामं अडली आहेत आणि यामुळे कोणी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारला डोईजड झाली आहे. कारण राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45 हजार कोटींचा बोजा पडलाय. या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे इतर विभागांच्या विकासकामांवर त्याचा परीणाम झालाय. राज्यात विकासकामांची कोट्यवधीची बिलं थकलीत. चार लाख कंत्राटदार अडचणीत आलेत. 4 जुलै 2024 पासुन विविध विभागातील तब्बल 89 हजार कोटी रूपये बिलापोटी थकले आहे.

पाहुयात कोणत्या विभागात किती थकबाकी आहे...

- सार्वजनिक बांधकाम विभाग - ४६ हजार कोटी

- जल जीवन विभाग - १८ हजार कोटी

- जल संधारण विभाग - १९७०० कोटी

- ग्राम विकास विभाग - ८६०० कोटी

- नगरविकास विभाग - १७०० कोटी

दरम्यान, बिल थकल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून कामबंदचा इशारा दिलाय. लाडकी बहिण योजनेमुळे बिल थकल्याची वस्तुस्थिती सत्ताधाऱ्यांनी नाकारली नाही. हा संकटाचा बॅड पॅच आहे. पण योजना थांबवता येणार नाही, असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय.

स्टेट बँक ऑफ इंडियानेही काही दिवसांपूर्वी एका अहवालातून लाडकी योजनेचा परीणाम बजेटवर होणार असल्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे लाडकी योजना सुरु ठेवताना महायुतीची कसरत होतेय. अशा स्थितीत आता वाढीव 2100 रुपयांचा हफ्ता कसा देणार? आणि विकास काम कशी पूर्ण करणार याकडे राज्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sooryavansham : 'सूर्यवंशम' मधील हीरा ठाकुरचा मुलगा आता कसा दिसतोय? इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव, पाहा फोटो

Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

LPG Cylinder Price: तुमच्या शहरात LPG गॅस सिलिंडरची किंमत किती? बुकिंग करण्याआधी दर जाणून घ्याच

Accident News : ४० हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT