Crime News : क्रूरतेचा कळस! शिर धडापासून वेगळे केलं; शिर एका विहिरीत, तर धड दुसऱ्या विहिरीत फेकलं

Ahilya Nagar News : अहिल्यानगरच्या बोधेगावच्या पहिलवान बाबा मंदिराच्या ७० वर्षीय सेवेकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर केलेल्या क्रूर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.
Ahilya Nagar Crime News
Ahilya Nagar Crime NewsSaam Tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ahilya Nagar Crime News : अहिल्यानगरमध्ये एक कूर घटना घडली आहे. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी यांची हत्या करण्यात आली. त्यांचे शिर धडावेगळे करण्यात आले. त्यानंतर मारेकऱ्यांनी एका विहिरीमध्ये त्यांचे शिर, तर दुसऱ्या विहिरीमध्ये धड फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सेवेकरी व्यक्तीचे नाव नामदेव दहातोंडे (वयवर्ष ७०) असे आहे. ते मागील पंधरा वर्षांपासून बोधेगावच्या पहिलवान बाबा मंदिरात साफसफाईचे काम करत होते. २६ जानेवारीपासून ते बेपत्ता होते. तेव्हा मंदिराचे पुजारी एकनाथ घोरतळे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

दरम्यान मंदिराच्या शेजारच्या विहिरीतून दुर्गंध यायला लागला. जवळ गेल्यावर पाण्यावर धड नसलेले शिर तरंगत असल्याचे पाहायला मिळाले. घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी शिराचे धड शोधायला सुरुवात केली. तपास सुरु असताना मंदिरापासून काही अंतरावर एका विहिरीत वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Ahilya Nagar Crime News
Pune News : पुण्यात बनावट जामीनदाराच्या रॅकेटचा पदार्फाश; वकिलांसह ११ जणांना अटक

पोलिसांना विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड आढळले. पुढे तपासादरम्यान हे शिर आणि धड सेवेकरी नामदेव दहातोंडे यांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची हत्या का आणि कोणी केली याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. दरम्यान या क्रूर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahilya Nagar Crime News
Navi Mumbai Crime: कट मारल्याने डोक्यात तिडीक गेली, खाली उतरुन हेल्मटेने जबर मारहाण; पोलिसांत तक्रार करतानाच...पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com