Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Maharashtra Budget 2025: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अजित पवारांनी अर्थसंकल्पात काय सांगितलं?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Siddhi Hande

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३६००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. मात्र, लाडक्या बहिणींना २१०० मिळणार की नाही याबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली नाही.

अजित पवार काय म्हणाले?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

यानंतर विधानसभेत अजित पवारांना २१०० रुपये देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्प होऊ द्या, मग सांगतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT