Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत पुन्हा नोंदणी सुरू होणार? सरकारकडे केली मागणी, काय निर्णय होणार?

Ladki Bahin Yojana Application Restart: लाडकी बहीण योजनेत पुन्हा अर्जप्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली जात आहे. ज्या मुली आता २१ वर्षांच्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु करा अशी मागणी केली जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी

ज्या मुली आता २१ वर्षांच्या झाल्या त्यांच्यासाठी अर्ज सुरु करा

सरकार काय निर्णय घेणार?

लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी केली जाणार आहे. या योजनेत आता महिलांना पुन्हा अर्ज करता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता आदिती तटकरेंच्या पोस्टवरदेखील अनेकांनी असे प्रश्न विचारले आहेत. अनेकांनी योजनेसाठी अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

अर्ज पुन्हा सुरु करण्याची मागणी (Ladki Bahin Yojana Application Restart)

लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. दरम्यान, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अर्जप्रक्रिया बंद झाली. त्यानंतर ज्या मुली २१ वर्षांच्या झाल्या त्या मुलींना अर्ज करता येत नसल्याची तक्रार अनेकजण करत आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा अर्जप्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

Ladki Bahin Yojana

आदिती तटकरेंच्या पोस्टवर कमेंट

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी ट्विट करत माहिती दिली. त्यावर एकाने कमेंट केली आहे की, नवीन लाभार्थ्यांना हा लाभ कधी चालू करणार आहात. मुलीचे वय २१ पूर्ण झाले परंतु तिला अर्ज करता येत नाही, असं म्हटलंय. त्यामुळे आता ज्या मुलींचे वय २१ झाले आहे त्यांच्यासाठी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला हे. त्यातील अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. आता लाडकी बहीण योजनेत २ लाख ३० हजारपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत आहेत. अजूनही काही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. त्यामधूनदेखील अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

La Nina : अतिवृष्टीनंतर राज्यावर आणखी एक संकट, आताच तयारीला लागा, IMD दिला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्सप्रेसवर दगडफेक

Whatsapp Crime : व्हॉट्सअ‍ॅपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग ठरली घातक! व्यावसायिकाला ४ लाखांचा फटका, नेमकं झालं काय?

Lakshmi Niwas: जान्हवीची जयंतपासून सुटका; भावना-सिद्धूच्या नव्या नात्याची सुरुवात 'लक्ष्मी निवास'मध्ये येणार 'हे' मोठे ट्विस्ट

Jalgaon : हद्दच झाली! दागिन्यांसाठी स्मशानभूमीतून अस्थी चोरी; जळगावात आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT