Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीची पुन्हा पडताळणी होणार, सरकारचा मोठा निर्णय, या महिलांचे ₹१५०० बंद होणार

Ladki Bahin Yojana Verification Process: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटोकोरपणे पडताळणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) नावाखाली फसवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली तब्बल २५०० फ्रॉड बँक खाती उघडून त्यातून लाखो रुपयांचे व्यव्हार झाल्याची घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या घरातील पुरुषांच्याही कागदपत्रांचा वापर करुन सायबर गुन्हे केले आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाला जाग आहे. महिला व बालविकास विभागाने अर्जांची पडताळणी काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत. या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खूप फसवणूक होत आहे. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश जिल्हा महिला विभागांना देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांना नियमांचे पालन केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते. यातील काही महिलांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नव्हते. त्यामुळे पडताळणी केली जात होती. लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी केली जात होती. त्यानंतर आता पात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे, असं महिला विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मार्च महिन्यात तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले आहेत. यातील अजूनही काही महिला निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे आता पुन्हा काटेकोरपणे पडताळणी करण्यास सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांची कागदपत्रे घेऊन केवायसी करुन बँक खात्यात व्यव्हार करण्यात आले. याचसोबत महिला व पुरुषांचे नाव जर सारखे असेल तर त्या पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतला असल्याचे नाकारता येत नाही. (प्रितम हे महिला आणि पुरुष दोघांचेही नाव असू शकते) यामुळे आता योजनेची काटेकोरपणे पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT