Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही? महायुतीच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे दिसत आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जात आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. मात्र, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर २१०० रुपये देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहि‍णींना २१०० मिळणार की नाही?

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवला असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. दोन खात्यांमधील पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आला आहे,असंही त्यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) निधीबाबत फेब्रुवारीत फाइल मिळाली होती. त्यावेळी त्यांनी लिहलं होतं की, पैसे देणं शक्य होणार नाही. लाडकी बहीण योजनेचा बोजा आहे. १५०० चे २१०० रुपये करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती स्वीकारावी लागेल, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना २१०० मिळणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर पैसे देऊ

लाडकी बहीण योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर २१०० रुपये मिळतील, अशी आशा महिलांना होती.मात्र, आता निवडणुकांनंतर ६ महिने झाले तरीही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. याचसोबत लाडक्या बहि‍णींना निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचेही चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकार कर्ज घेणार आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ, असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT