Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार? या दिवशी सरकार देणार खुशखबर

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update: लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची प्रतिक्षा आहे. २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहे. दरम्यान याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना आता २१०० रुपयांची प्रतिक्षा आहे. महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. त्यानंतर आता हे पैसे कधी दिले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याची घोषणा लवकरच होऊ शकते. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पा होऊ शकते. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. दरवर्षी १ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार याबाबत घोषणा करु शकतात.

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत जर महिलांना २१०० रुपये मिळाले तर महिला खूप खुश होणार आहेत.

५ लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख अपात्र महिलांचे अर्ज बाद केले आहेत. ज्या महिलांना निकष डावलून अर्ज केले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये वयाच्या अटीत न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे. काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात घोषणा होणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले होते. याचसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील, असं सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT