Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही, कारण काय? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना २१०० रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात ७ वा हप्ता जमा झाला आहे. या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, मंत्री आदिती तटकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Ladki Bahin Yojana)

एकाच योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेच्या अटी (Ladki Bahin Yojana Eligibility)

योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

महिलेचे वय २१ ते ६५ वयोगटातील असावे.

या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावे.

जर महिला सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरु

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितले आहे. या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांना स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहे. पात्र नसल्याने सांगत त्यांनी अर्ज परत केले आहेत. त्यामुळे अपात्र महिला जर या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी स्वतः हून माघार घ्यावी, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT