.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
राज्य सरकारची लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक बाब समोर आलीय. राज्यातील महिलांऐवजी बांगलादेशी महिलादेखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलंय. राज्यातील महिलांऐवजी परदेशातील महिला बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा पैसा मिळवत असल्यानं आता या योजनेत मोठा बदल केला जाणार आहे.
बांगलादेशी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याची बाब लक्षात येताच या योजनेत मोठा बदल केला जाणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलीय. आता एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. कामाठीपुरातील एका महिलेने या योजनेचा लाभ घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ५ बांगलादेशींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी एका दलालालाही अटक झालीय.
या बांग्लादेशी महिलेने भारतात घुसखोरी केली त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. या महिलेने खोटी कागदपत्रे बनवून या योजनेचा लाभ घेतला. एजंटकडून बनावट कागदपत्रे बनवली होती. बनवाट कागदपत्र बनवून देणाऱ्या एजंटलादेखील अटक करण्यात आलीय. राज्यातील महिलांऐवजी दुसऱ्या घुसखोर करणाऱ्या महिला योजनेचा लाभ घेत असल्यानं या योजनेत मोठा बदल करण्यात येणार आहे, याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
बांगलादेशींची घुसखोरी वाढलीय. देशात सर्वत्र ही समस्या उद्धभवत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरात जास्त बांगलादेशी असल्याचे समोर येत आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केलेला व्यक्तीदेखील बांगलादेशी होता. राज्य सरकारची लोकप्रिय योजनेच्या लाभ घुसखोर बांगलादेशी घेत असल्यानं योजनेत बदल केला जाणार आहे. अपात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ नये, यासाठी आधार कार्ड आता लिंक केलं जाणार आहे. योग्य त्या महिलेला लाभ दिला जाणार आहे. त्यावेळी आम्हाला वेळ मिळाला नाही, मात्र आता तपासणी केली जाणार असल्याचं अजित पवार म्हणालेत.
अपात्र महिला अर्जदारांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तटकरे यांच्या विधानाने अपात्र महिला अर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय. आदिती तटकरे म्हणाल्या, 'काही महिलांना आता माहिती मिळत आहेत की, त्या अपात्र आहेत. त्यामुळे काही महिला अर्ज मागे घेत आहेत. आम्ही त्यांच्या लाभाला हात लावला नाही. आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. तसेच माहिती देखील मागवलेली नाही असं तटकरे म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.