BJP MP Udayanraje Bhosale spoke about the financial burden of the Ladki Bahin Yojana during a meeting in Satara. Saam TV marathi News
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर खूप ताण पडलाय, भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडल्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. विकासकामांसाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Udayanraje Bhosale On Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana latest news : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'वरून विरोधक सातत्याने तिजोरीवर पडणाऱ्या ताणाचा मुद्दा उपस्थित करतात. पण आता सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यानेच यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे बोलताना लाडकी बहीण योजनेमुळे इतर कामांचे फंडिंग रखडल्याचे वक्तव्य केलेय. उदयनराजेंच्या या थेट विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजना सरकारने आणली त्यामुळं तिजोरीवर ताण खूप पडला आहे. फंडिंग जितकं यायला पाहिजे तितकं येत नाही. नियोजन करुन मार्ग कसा काढता येईल, त्यासाठी ही बैठक घेतली असे ते म्हणाले. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची रविवारी बैठक घेतली होती. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी लाडकी बहीण टीकेमुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

निधीची कमतरता, मार्ग कसा काढायचा?

सरकारने 'लाडकी बहीण योजना' राबवली, त्यामुळे राज्यावर आणि राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. सध्या विविध विकास प्रकल्पांसाठी अपेक्षित निधी मिळत नाहीये. ही परिस्थिती लक्षात घेता शहराच्या विकास कामांचे नियोजन कसे करावे आणि पुढे जाण्यासाठी ठोस मार्ग कसा शोधावा? यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची हायव्होल्टेज बैठक

सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची रविवारी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. पालिकेच्या कामात कुठलाही सावळागोंधळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला. जे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, त्यांना प्रशासकीय कामांचा अनुभव कमी आहे, त्यामुळे पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले नगरपालिका बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Star Fruit : आंबट समजून 'स्टार फ्रूट'कडे करताय दुर्लक्ष, ते हृदयासाठी गुणकारी; फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

SCROLL FOR NEXT