Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! आता 'या' महिलांना मिळणार ९००० रुपये

Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. आता लाडकी बहीण योजनेत काही महिलांना ९००० रुपये मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. या योजनेत महिलांना आता २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना ९००० रुपये मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ हप्ते जमा झाले आहेत. आता महिला सहाव्या हप्त्याची वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत आणि त्यांना पैसे आले नाहीत त्यांना एकदम ९००० रुपये येऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेतील ६ हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार,ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. मात्र, आता या महिलांना सहा महिन्याचे हप्ते एकदम येऊ शकतात.

डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार? (When will December Month Installment Come)

लाडक्या बहि‍णींचे लक्ष आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खातेवाटपानंतर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच डिसेंबर महिना संपायला अवघे १०-१२ दिवस उरले आहेत. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याला हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

२१०० रुपये कधी मिळणार? (When 2100 Rupees Come)

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनो मार्चपर्यंत थांबा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran: शक्य तितक्या लवकर इराण सोडा, युद्धविरामानंतर केंद्र सरकारकडून भारतीयांना सूचना जारी; नेमकं काय म्हणाले?

Viral Video: बनाना राइड करताना भयंकर अपघात, पर्यटक उंच उडून समुद्रकिनाऱ्यावर पडले; थरारक VIDEO व्हायरल

Ramai Awas Yojana: या नागरिकांना मिळणार हक्काचं घर, सरकार करणार खर्च; काय आहे रमाई आवास योजना?

Water Bottle Cap Colour Meaning: काळा, निळ्या की लाल, कोणत्या बाटलीच्या झाकणातील पाणी आरोग्यासाठी बेस्ट?

Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनच्या बर्थडे सेलिब्रेशनला मोठा राडा; पोलिसांचा चाहत्यांवर लाठीचार्ज, VIDEO

SCROLL FOR NEXT