Uddhav Thackeray on Ladki Bahin yojana
Ladki Bahin yojanaSaam tv

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरे मैदानात; महायुती सरकारकडे केली मोठी मागणी, पाहा VIDEO

Ladki Bahin yojana update : लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी...लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या...निकष बाजूला ठेवून 2100 रुपये जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. लाडक्या बहिणींना कधी मिळणार वाढीव हप्ता पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट..
Published on

महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देणार अशी घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्ताही आली. मात्र, 2100 रूपये सोडा..डिसेंबर महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ताही लाडक्या बहिणीला मिळालेला नाही. त्यामुळे २१०० रूपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे डोळे लागले आहेत. मात्र ही प्रतीक्षा आणखीनच लांबणार असून अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च 2025 पर्यंत वाढीव निधीसाठी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

लाडक्या बहिणीला 2100 रू. कधी?

मार्चपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2,100 रुपये?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2,100 रुपये देण्याचा निर्णय?

डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार

अर्जदारांचा आकडा 2 कोटी 47 लाखांपर्यंत

आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होणार

त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी संधी साधत लाडकीवरून सरकारला टार्गेट केलंय. लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या...निकष बाजूला ठेवून 2100 रुपये जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.

35 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. मात्र डिसेंबरचा हप्ता आणि वाढीव २१०० रूपये कधी मिळणार याकडे राज्यातल्या साऱ्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com