Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ₹३००० जमा होणार, हप्त्याची संभाव्य तारीख आली समोर, वाचा अपडेट

ladki bahin yojana installment date latest news : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट! मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून ३००० रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्येतही मोठी घट झाली आहे.

Namdeo Kumbhar

राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकाचवेळी ३ हजार रूपयांचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र, आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3 हजार रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल ४५ लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आलीय. आता लाभार्थ्यांची संख्या 1.8 कोटींवर आली आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप जमा न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्याचे दोन हप्ते एकत्र कधी जमा होणार? याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात २ महिन्याचा लाभ एकत्र जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून पावले उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकीचे हप्ते का रखडले, नेमकं कारण काय?

आर्थिक वर्ष अखेर (Financial Year Ending) आणि e-KYC प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत. लवकरच लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

लाभार्थी संख्येत मोठी घट :

e-KYC अनिवार्य केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत मोठी छाटणी झाली आहे. सुमारे ५४ लाख लाभार्थी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांची संख्या आता जवळपास २ कोटी ४० लाखांवरून १ कोटी ८० लाख इतकी झाली आहे. अर्जांच्या छाननीनंतर सरकारी कर्मचारी आणि नियमबाह्य अर्ज करणाऱ्या पुरुषांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आता केवळ पात्र महिलांनाच याचा लाभ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: घरकुल कामासाठी ३ हजारांची लाच घेताना सावरगावचा ग्रामरोजगार सेवक (acb)च्या जाळ्यात

Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला, वाचा नेमका काय घेतला निर्णय?

केरळच्या मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी? राज्यात खलबत|VIDEO

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ; वासरासाठी गायीनं केला गाडीचा पाठलाग

Mango vs Aamras : 'आंबा' की 'आमरस' उन्हाळ्यात शरीरासाठी काय खाणं योग्य? वाचा

SCROLL FOR NEXT