Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अर्थसंकल्पात लाडक्या बहि‍णींची निराशा, आता २१०० रुपये कधी येणार? जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. पुढच्या पाच वर्षात कधीही लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. लाडक्या बहि‍णींसाठी अर्थसंकल्पात २१०० रुपयांची तरतूद होईल, असं सांगितलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. पुढच्या पाच वर्षात कधीही लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची घोषणा होऊ शकते. (Ladki Bahin Yojana)

विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ, अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. दरम्यान, अजूनही २१०० रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

काही दिवसांपूर्वी आदिती तटकरेंनी विधानसभेत २१०० रुपयांबाबत माहिती दिली होती. लाडकी बहीण योजनेत या अर्थसंकल्पात पैसे दिले जातील, अशी घोषणा आम्ही कधीच केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्यांनी सांगितले होते. त्यामुळे महायुती सरकारच्या येत्या ५ वर्षाच्या काळात कधीही २१०० रुपये येऊ शकतात. परंतु हे पैसे कधी येणार याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्च रोजी जमा झाला. तर मार्चचा हप्ता १२ तारखेला जमा झाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीच. म्हणजेच त्यांचे अर्ज कदाचित बाद झालेले असू शकतात.

९ लाख महिला बाद

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. एकूण ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांबाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT