Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का? जाणून घ्या नियम

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. या योजनेअंतर्गत आता ज्या महिलांनी अर्ज केला नाही त्यांना अर्ज करता येणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Siddhi Hande

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आता विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार असल्याचे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. (Ladki Bahin Yojana)

आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरला नाही. काही अडचणींमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही, अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का अशा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. परंतु अनेक महिलांना अर्ज भरता न आल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही. (Ladki Bahin Yojana Application Process)

लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाहीत पैसे (Ladki Bahin Eligibility)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही निकष दिले आहेत. त्या निकषांचे पालन केल्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे.

अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

२१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत.

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT