Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ७० लाख महिलांचा ₹१५०० चा हप्ता बंद, अपात्र लाडकींकडून सरकार पैसे वसूल करणार? महत्त्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana 71 Lakh Women Ineligible: लाडकी बहीण योजनेतून तब्बल ७१ लाख महिलांचा लाभ बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

७१ लाख महिलांचा लाभ बंद

अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार का?

लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पात्र नसल्याने अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. याचसोबत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी न करणाऱ्यांची संख्यादेखील लाखोंमध्ये आहे. जवळपास ७१ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांकडून आता पुन्हा पैसे परत घेतले जाणार की काय अशीही चर्चा सुरु झाली आहे.

७१ लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार? (Will Government Take Money from 71 Ineligible Beneficiaries of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीसाठी सप्टेंबर २०२५ पासून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी सुरुवातीला दोन महिन्यांची मुदत होती. ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, केवायसीमध्येही अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच केवायसीच्या दुरूस्तीसाठीही मुदतवाढ दिली आहे. याआधीची मुदत ३१ मार्च होती. त्यानंतर ही मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

योजनेत जवळपास ३०-४० लाख लाभार्थ्यांनी ईकेवायसी न केल्याने त्यांचा लाभ बंद केला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३०-४० लाखांच्या आसपास महिलांनी ईकेवायसी पूर्ण केलेली नाही. त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. ज्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला त्यांच्याकडून शासन पैसे वसूल करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपात्र महिलांनी पात्र म्हणून लाभ घेता असल्यास त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात. परंतु या प्रकरणात कोणताही निर्णय झाला नाही, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. याबाबत बीबीसी मराठीने वृत्त दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT