Maharashtra Ladki Bahin Scheme Update saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Maharashtra Ladki Bahin Scheme Update: लाडकी बहीण योजनेतला १५०० रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाचा थांबवला जाणार याचा संभ्रम संपला आहे. ई-केवायसी, पात्रता, उत्पन्न मर्यादा आणि आधार-बँक तपशील तपासणे महत्त्वाचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत सर्वसामान्य महिलांच्या मनात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता नक्की कोणाच्या बँक खात्यात जमा होणार आणि कोणत्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार, याविषयी प्रशासनाकडून स्पष्टता आली आहे. अर्जातील काही चुका, नियमांचे उल्लंघन किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे हजारो महिलांचे पैसे थांबण्याची शक्यता आहे. ईकेवायसीनंतर अपात्र ठरलेल्या ८० लाखांपेक्षा जास्त महिलांचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा केला जातो. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार डीबीटीद्वारे १५०० रूपयांची जमा करतं. पण नुकत्याच झालेल्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर अनेकांचा लाभ बंद झाला आहे. पुढील आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यांचा सन्मान निधी जमा होणार आहे. पण फक्त पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५०० जमा होतील.

कोणत्या महिलांना ऑगस्ट - सप्टेंबरचा हप्ता मिळणार?

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेने सरकारने ठरवलेल्या सर्व अटी पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि तिचं वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे. विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांनाच योजनेत पात्र समजून लाभ दिला जाईल. कुटुंबातील एक अविवाहित महिलेलाही लाभ मिळू शकतो. तसेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपर्यंत असणं खूप गरजेचं आहे. तरच या योजनेचा लाभ घेता येतो.

ई-केवायसी झाली म्हणजे हप्ता मिळेलच असं नाही

ज्या महिला लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. फक्त ई-केवायसी पूर्ण केल्याने योजनेचा लाभ कायम राहीलच असं नाही. ई-केवायसीसोबतच इतर पात्रता निकषांचीही पडताळणी केली जाते. त्यामुळे चुकीची माहिती किंवा अपूर्ण पात्रता आढळल्यावर लाभार्थी यादीतून नाव वगळले जाऊ शकते.

कुणाचा हप्ता बंद होणार?

वयोमर्यादा पूर्ण न करणाऱ्या, २.५० लाखांपेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या, महाराष्ट्राच्या पात्र रहिवासी नसणाऱ्या किंवा पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ थांबू शकतो. तसेच ई-केवायसी किंवा आवश्यक अपडेट पूर्ण नसतील, आधार-बँक खात्याच्या माहितीत चूक असेल तरीही हप्ता अडकू शकतो.

ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?

गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांचा हप्ता मिळू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून तशी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. १६ सप्टेंबरनंतर महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT