

देशातल्या गरजू आणि गरीब नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (AB-PMJAY) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेच्या लाभार्थ्यांना शुभेच्छा देत योजनेच्या कामगिरीची माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी सांगितलं की, सध्या ६० कोटींपेक्षा जास्त नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच मिळत आहे. त्यामुळे ही योजना जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक ठरली आहे. उपचाराला खर्च कमी करण्यासोबतच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक आधार मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत ४८.५४ कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच १३ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना उपचाराचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे लाखो कुटुंबांना गंभीर आजारांवरच्या उपचारांसाठी मोठ्या खर्चाचा भार कमी करायला मदत झाली आहे.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशभरातल्या ३९ हजारांपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी रुग्णालये सूचीबद्ध आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी आतापर्यंत २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हॉस्पिटलायझेशन आणि उपचारांचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
आयुष्यमान कार्डासाठी सर्वप्रथम आपण योजनेसाठी पात्र आहोत का, हे तपासणं गरजेचं आहे. यासाठी beneficiary.nha.gov.in या अधिकृत पोर्टलचा वापर करता येतो. पात्रता तपासल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार कार्डासाठी अर्ज करता येतो. आयुष्यमान भारत मोबाइल अॅपचाही वापर करता येतो. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराचे कवच मिळू शकते. त्यामुळे तुमचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असल्यास आयुष्यमान कार्ड आहे की नाही, हे तपासणं महत्त्वाचं ठरतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.