Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात; 'या' महिलांना मिळणार ४५०० रुपये

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान तिसऱ्या महिन्याचे अनुदान हे २९ सप्टेंबर रोजी दिले जाणार आहे. आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे. त्यामुळे आता ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेत त्यांच्याही अकाउंटला लवकरच १५०० रुपये जमा होणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख ३१ हजार २९४ नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र, आतापर्यंत अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक करावेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ३००० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४५०० रुपये मिळणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही कसं चेक कराल?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे खात्यात पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते बघू शकतात. तसेच बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra News Live Updates:विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सुरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्याय यांनी केली भविष्यवाणी

Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT