Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

Ladki Bahin Yojana KYC: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा लाभ बंद केला जाईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य

लाडक्या बहिणींनी केवायसी न केल्यास लाभ बंद

पात्र महिलांनाच लाभ मिळावा हा यामागचा उद्देश

लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास सांगितले आहे. ई केवायसी करण्याची शेवटची तारीख वाढवून ३१ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे महिलांना केवायसी करण्यात अडचणी येतात. याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल होती. त्यामुळे महिलांना केवायसी करता आली नाही. यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान, आता ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

ई केवायसी करणे गरजेचे आहे का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे.या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहचावा. जर तुम्ही बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केले असतील. तर किंवा बँक अकाउंटबाबत चुकीची माहिती दिली असेल तर त्याबाबतच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात. यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे. दरम्यान, यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यामुळे पारदर्शकता राहणार आहे. याचमुळे फक्त पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

ई केवायसी करण्याची प्रोसेस (Ladki Bahin Yojana eKYC Process)

तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन ऑनलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

केवायसी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जावे लागणार आहे.

यामधील ई केवायसी सेक्शनवर क्लिक करावे लागणार आहे.

यानंतर आधार कार्ड, कॅप्चा कोड टाकावा लागेल.

यानंतर तुमचे जर केवायसी पूर्ण झाले असेल तर तसा मेसेज तुम्हाला येईल. जर केवायसी पूर्ण झाले नसेल तर पुढची प्रोसेस करायची आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे केवायसी करायचे आहे.यासाठी तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

SCROLL FOR NEXT