Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद; 'ती' एक चूक पडली महागात

Ladki Bahin Yojana These Women Will Not Get 1500 Rupees: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाखो महिलांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. केवायसी न केलेल्या महिलांना यापुढे १५०० रुपये मिळणार नाहीयेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार

केवायसी न केलेल्या महिलांना फटका

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना यापुढे दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीयेत. त्यांना एक चूक महागात पडली आहे.

या महिलांचा लाभ बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped)

लाडकी बहीण योजनेत महिलांना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. केवायसी करणे अनिवार्य होते. मात्र, अनेक महिलांनी अजूनही केवायसी केले नाही. केवायसी न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीयेत. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेबंर २०२५ होती. त्याआधी ज्यांनी केवायसी केले आहे. त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. इतर महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.

अपात्र महिलांवर टांगती तलवार

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी केवायसी केले आहे. मात्र, केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आता त्यांना चुक सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, यामध्ये महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. अन्यथा तुमचाही लाभ बंद केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT