Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा ईकेवायसीनंतरही बंद होणार लाभ; ३० एप्रिलनंतर मिळणार नाही ₹१५००; नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped Permanant: लाडकी बहीण योजनेत केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, केवायसी करनदेखील अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी

केवायसी केली तरी बंद होणार लाभ

नेमकं कारण काय?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. ज्या महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे आणि त्यात काही त्रुटी आहेत त्यांनी लगेच दुरुस्ती करायची आहे. ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. त्यानंतर महिलांना केवायसी करण्याची संधी मिळणार नाहीये.दरम्यान, केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत. त्याचसोबत केवायसी केलेल्याही काही महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

केवायसी करुनदेखील लाभ होणार कायमचा बंद (Ladki Bahin Yojana These Women Benefit Stopped After Ekyc Done)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. त्यानंतर ज्या महिलांच्या केवायसीत चुका झाल्या आहेत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठीही अवघे काही दिवस उरले आहे. जर तुम्ही डेडलाइनपूर्वी केवायसी केली नसेल तर तुमचा लाभ कायमचा बंद झाला असेल. जर तुम्ही आता केवायसीत दुरुस्ती केली नाही तरीही तुमचा लाभ बंद होणार आहे.

केवायसी करुनदेखील लाभ बंद होण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana Benefit Stopped Even After eKYC)

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.यामध्ये अनेक महिला वयोमर्यादेत बसत नाही तर अनेक महिला उत्पन्नाच्या निकषात बसत नाही. परंतु केवायसीमध्ये याबाबत सर्व माहित उघड होणार आहे. महिला जर निकषात बसत नसतील तर त्यांचा लाभ पडताळणीनंतर बंद केला जाणार आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या आणि केवायसी न करणाऱ्या महिलांचे लाभ ३० एप्रिलपासून बंद होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

Night Walking : रात्रीच्या जेवणानंतर १० मिनिटे चालल्यास काय होते? ७ जबरदस्त फायदे वाचून तुम्हीही आजपासूनच कराल सुरुवात

Blast: केमिकलच्या कंपनीत भीषण स्फोट, ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

SCROLL FOR NEXT