Ladki Bahin Yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? महत्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana September Installment Update: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकींना १५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट

  • सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार

  • दिवाळीपूर्वी पैसे मिळणार असल्याने लाडकींमध्ये आनंदाचे वातावरण

महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची लाभार्थी महिला वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकींच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगितले जात होते. पण ३१ तारीख आली तरी पैसे आले नाहीत.

आता सप्टेंबरच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट आली आहे. लाडकींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होतील त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाली गोड होईल. सध्या शासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे त्यामुळे लवकरच ही रक्कम लाडकींच्या खात्यात जमा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. सप्टेंबरच्या हत्याचे १५०० कधी मिळतील याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे.

नुकताच फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरच निधी हस्तांतरीत केला जाईल आणि दिवाळीपूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा होईल अशी शक्यता आहे.

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्रित मिळतील अशी आशा होती. पण लाडक्या बहिणींना फक्त सप्टेंबरच्या हप्त्याचे १५०० रुपये मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा दिवाळीत लाडकींना ३००० रुपये एकत्रित मिळणार नसून फक्त १५०० मिळतील. या पैशांमुळे लाडकींना दिवाळीच्या सणात घरखर्चात हातभार लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

Vastu Tips: घरात दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं शुभ की अशुभ? वाचा वास्तूशास्त्राचा नियम नेमकं काय सांगतो

Maharashtra Epstein Files: अशोक खरातची भूमिका साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता! 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'मधील गूढ उकललं

Breaking News : मोठी बातमी! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही ठरली, राजकारणात खळबळ

Shraddha Kapoor Photo : अप्सरा आली...; नऊवारी साडीत श्रद्धा कपूरचा मराठमोळा थाट! गजरा अन् नथीच्या नखरा पाहून चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT