Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! दिवाळीत खात्यावर पैसे जमा होणार; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

Ladki Bahin Yojana September Installment update: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीपूर्वी लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! दिवाळीत खात्यावर पैसे जमा होणार; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर
Ladki Bahin Yojana September Installment updatemeta ai
Published On: 
  • लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार

  • लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर

  • दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीत लाडकींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाला निधी मंजूर करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाडकींच्या खात्यावर पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी येणार याची वाट पाहत आहे. सप्टेंबर महिना संपत आला आणि दिवाळी जवळ आली तरी देखील खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. आता त्यांची चिंता दूर होणार आहे. कारण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी सरकारने ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! दिवाळीत खात्यावर पैसे जमा होणार; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर
Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेकडे वळवला आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सप्टेंबरचे १५०० रुपये दिले जाणार आहे. यासाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांना पैसे देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! दिवाळीत खात्यावर पैसे जमा होणार; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ८१ लाख महिलांना पुन्हा ₹१५०० मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com