Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Ladki Bahin Yojana October Installment Date: लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता जमा झाला. त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे १५०० रुपये जमा

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार

दिवाळीत पैसे येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची दिवाळी आणखी गोड होणार आहे. दिवाळीच्या आधीच लाडक्या बहि‍णींना सप्टेंबरचा हप्ता देण्यात आला आहे. या २-३ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. दरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत ते लवकरच जमा होतील. दरम्यान, सप्टेंबरचा हप्ता तर मिळाला मात्र ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana October Installment Update)

ऑक्टोबर महिना सुरु होऊन १० दिवस उलटून गेले आहे. ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यात आला. आता ऑक्टोबरचा हप्तादेखील लांबणीवर जाणार का असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, लवकरच ऑक्टोबरचे पैसे जमा केले जातील.

दिवाळीत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकतो.दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. साधारणपणे महिनाअखेरीस महिलांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो. त्यामुळे कदाचित शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून लाडक्या बहि‍णींचे हप्ते लांबणीवर जात आहेत. त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जेव्हा आदिती तटकरे अधिकृत घोषणा करतील त्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

सप्टेंबरचे पैसे जमा झाले की नाही? (Ladki Bahin Yojana September Installment Recieve or not)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबरचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही मोबाईलवरुन चेक करु शकतात. तुम्हाला पैसे जमा झाल्यावर मेसेज येईल. तसेच तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन १५०० रुपये आले की नाही हे चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aho Meaning: लग्नानंतर बायको "अहो" का म्हणते? शब्दाचा अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma : मोठी बातमी ! रोहित शर्मा कर्णधार होणार; 'दुर्लक्षित' फलंदाजाला मिळू शकते टीम इंडियात संधी

Pune News: पुण्यात कडाक्याची थंडी; पण शेकोटीला बंदी, महापालिकेचा अजब निर्णय

Maharashtra Politics: पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा ग्लॅमरस रॉयल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT