Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana October Installment Date: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरीही हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर

नोव्हेंबर महिन्यात पैसे येण्याची शक्यता

ऑक्टोबर-नोव्हेंबरचे ३००० रुपये एकत्र येणार का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, आता ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर जाणार आहे. ऑक्टोबर महिना संपला तरीही पैसे आले नाही त्यामुळे महिलांमध्ये खूप नाराजी आहे. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

ऑक्टोबर महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता आता पुढच्या महिन्यात मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुढच्या महिन्यात सुरुवातीच्या १५ दिवसात पैसे येऊ शकतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर तुम्हाला निवडणुकाआधी पैसे दिले जातील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे कोणताही निधी दिला जाणार नाही. यामुळेच निवडणुका लागण्यापूर्वी महिलांना पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर- नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana October-November Installment May Come Together)

ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे. परंतु आता नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात कदाचित महिलांना ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुका पुढील ३ महिन्यात होणार आहे. त्यामुळे या आचारसंहितेच्या काळात कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे हे दोन्ही हप्त एकत्र देणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

SCROLL FOR NEXT