Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात; काही महिलांच्या अकाउंटला ७५०० रुपये जमा

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत ३ महिन्यांचे हप्ते महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता दिवाळीपूर्वी महिलांना मोठी भेट मिळणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत.

दिवाळीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमादेखील झाले आहेत. परभणी येथील महिलांच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. (Ladki Bahin Yojana)

१० ऑक्टोबर रोजी महिलांच्या अकाउंटला दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असे सांगितले होते. मात्र, त्याआधीच आता पैसे जमा होण्या सुरुवात झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख ४० हजार महिलांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले आहेत. तर अनेक महिलांना ५ महिन्यांचे पैसे एकत्रितपणे आले आहे. लाडक्या बहिंणींना पाच महिन्यांचे एकूण ७५०० रुपये देण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला त्यांना ५ महिन्यांचे एकत्रित ७५०० रुपये मिळत आहेत. (Ladki Bahin Yojana October And November Month Installment)

लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवरुन ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. तसेच ऑफलाइन पद्धतने बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे आलेत की नाही चेक करु शकतात. (Ladki Bahin Yojana Installment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata: त्या फक्त अफवाच, माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका - रतन टाटा

Pandharpur Politics: उत्तम जानकरांना मोठा धक्का, माळशिरसमध्ये भाजप अन् आणखी एका पक्षाकडून तगडे आव्हान

Dates Benefits: रोज एक खजूर खा अन् आजारापासून दूर राहा; आरोग्यदायी फायदे वाचा

Nagpur Crime: नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार, मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला; दोघांचा मृत्यू

Indapur News : इंदापुरात दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील; पक्षप्रवेशानंतर उमेदवारी जाहीर होणार?

SCROLL FOR NEXT