Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! 'या' तारखेपर्यंत खात्यात जमा होणार १५०० रुपये

Majhi Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या ६ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचे समोर आले आहे. याच निधीमधून मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महिलांना पैसे येऊ शकतात.

येत्या ६ दिवसांत लाडक्या बहि‍णींना मेचा हप्ता मिळणार (Ladki Bahin Yojana May Month Installment)

लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला आहे. आदिवासी विकास खात्याचे तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यात आला आहे. महिला व बालविकास खात्याकडे हा निधी दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे.यामुळे येत्या काही दिवसांत १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. तसेच मे महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं बोललं जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मे-जूनचा हप्ता एकत्र (Ladki Bahin Yojana May-June Month Installment Come Together)

लाडकी बहीण योजनेत जर महिलांना मे महिनाअखेरपर्यंत पैसे मिळाले नाही तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो. महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. परंतु या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महिलांना पैसे कधी येणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे माहिती देतील. आदिती तटकरे स्वतः ट्विट करुन १५०० रुपये कधी येणार याबाबत माहिती देतात. ही अधिकृत माहिती आल्यावरच नक्की मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर विश्वास ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किती पोरांसोबत झोपलीस, रांxxx आहेस की... कोथरूड पोलिसांवर तरूणींच्या छळाचा आरोप

Second Shravan Somwar 2025: दुसऱ्या श्रावणी सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

IBPS Jobs : सरकारी नोकरीची संधी, तब्बल १० हजार जागांसाठी मेगाभरती! पगार वाचून थक्क व्हाल!

Maharashtra Live News Update : गर्दी झाली नाही म्हणून मंत्री चिडल्या, कानाखाली मारण्याची भाषा – रोहित पवारांचा संताप

Crime News : रांजणगावात पतसंस्थेवर दरोड्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस स्टेशन समोरील घटना

SCROLL FOR NEXT