Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना १५ दिवसांत खुशखबर मिळणार;खात्यात मे महिन्याचे ₹१५०० जमा होणार

Majhi Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता १५ दिवसांत मिळणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) अनेक चर्चा सुरु आहे.लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आता १५ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

आज मे महिन्याची १३ तारीख आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे मे महिना संपण्यासाठी १७-१८ दिवस उरले आहेत.त्यामुळे येत्या १५ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या दिवशी जमा होणार १५०० रुपये (Ladki Bahin Yojana May Month Installment Update)

गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये दिला जातो. त्यामुळे या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना गेल्या अनेक महिन्यापासून पैसे मिळाले नाही. यापुढेही काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहे. या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे झाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला सरकारी नोकरी करत नसावी. याचसोबत महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. तरच महिलांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Shreyas Iyer : टीम इंडियाला मोठा धक्का, उपकर्णधार गंभीर जखमी, ३ आठवडे संघाबाहेर

Avocado Sandwich Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी ॲव्होकॅडो सँडविच, दीर्घकाळ पोट भरलेले राहील

Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO

Grah Gochar November: नोव्हेंबर महिन्यांच्या २३ दिवसांमध्ये ३ ग्रह करणार गोचर; ४ राशी जगणार राजासारखं आयुष्य

SCROLL FOR NEXT