Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मे महिन्याचे पैसे खटाखट आले, जूनचे ₹ 1500 कधी येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana June Month Installment : लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. आधीच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, त्यानंतर जूनच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. आता एवढ्यात तरी जूनच्या हप्त्याबाबत काही घोषणा होईल, असं वाटत नाही.

जूनचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana June Month Installment)

लाडकी बहीण योजनेत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे डोळे लागले आहे. मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. एकाच महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहे. मे आणि जूनचा हप्ता एकाच महिन्यात जमा केला जाणार आहे.

लाडक्या बहि‍णींची पुन्हा पडताळणी (Ladki Bahin Yojana Verification)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. अनेक महिलांना निकषांबाहेर जाऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.यातील काही महिला सरकारी कर्मचारी आहेत. तर काही महिलांनी नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतला आहे. नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याचसोबत अनेक महिलांच्या घरात चारचाकी वाहनदेखील आहे. तरीही या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठीच महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे.

खात्यात १५०० रुपये जमा झाले की नाही कसं चेक कराल? (How To Check Ladki Bahin Yojana 1500 Rupees Installment Recieve Or Not)

लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहे. ते पैसे तुमच्या खात्यात आलेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन चेक करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन तुम्ही खात्यात पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन पैसे आलेत की नाही पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६१ हजार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट नाही,₹१५०० जमा झालेच नाही; कारण काय?

पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

'द लायन किंग'ला Mahavatar Narsimha पछाडणार; रक्षाबंधनला मोडले अनेक रेकॉर्ड, कलेक्शनचा आकडा किती?

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT