Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana May June installment update : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्र मिळून ₹3000 जमा होणार की फक्त ₹1500 मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana, ₹3000 Installment Date update : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात एकत्र मिळाला होता. पण आता जून महिन्याचा पहिला आठवडा संपला, पण हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना मे आणि जून या दोन महिन्यांचा ३००० रूपयांचा हप्ता एकत्र येणार का? असा प्रश्न राज्यातील पात्र महिलांना पडला आहे.

₹३००० की ₹१५००? लाडकीच्या खात्यात किती येणार पैसे?

राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात सरकारकडून १५०० रूपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता रखडला आहे. १८ जून रोजी निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात लाभ जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. पण लाडक्या बहि‍णींना मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? की फक्त मे महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होणार? अशी चर्चा सुरू आहे.

३००० एकत्र का मिळणार? कारण आले समोर

आचारसंहितामुळे १८ जूनपर्यंत राज्य सरकारला लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे पाठवता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जून महिन्याच्या शेवटाला वटपौर्णिमा आहे. या सणाचे औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहि‍णींना ३ हजार रूपयांचे गिफ्ट देऊ शकतो. सरकारकडून यावर विचार करण्यात येत असल्याचेही समजतेय.

किती महिलांना मिळणार लाभ ?

३० एप्रिल २०२६ पर्यंत लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी पूर्ण झाली. त्यानंतर सरकारकडून अर्जांची पडताळणी करण्यात आली. पण यामध्ये ८० लाख महिलांचा लाभ बंद झाल्याचे समजतेय. राज्यात आता एक कोटी ६६ लाख महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ सरकारकडून बंद करण्यात आला आहे. पण ज्या महिलांची ईकेवायसी राहिली आहे, त्या महिला पुन्हा एकदा अर्ज करू शकतात, असे संकेत सरकारकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Kidney : किडनी निकामी होण्याआधी सकाळी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करू नका अन्यथा...

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

LPG Connection: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ३० जूननंतर कट होणार गॅस कनेक्शन; आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT